मकरंद अनासपुरे यांचा ‘पाणी बाणी’ आजपासून (८ जुन) प्रदर्शित

मकरंद अनासपुरे, तेजा देवकर, रविंद्र मंकणी, रवीराज आणि ज्योत्स्ना राजोरीया यांचा आगामी चित्रपट ‘पाणी बाणी’ आजपासून (८ जून २०१८) महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची कथा ही गावात ठाण मांडून बसलेल्या जीवघेण्या दुष्काळाची आहे. आजवर मराठी चित्रपटामधून बरेच नवनवीन विषय हाताळले गेले आहेत असाच एका डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेवर आधारित दिग्दर्शक सदानंद दळवी व प्रज्योत कडू आणि निर्माते अतुल दिवे यांनी ‘पाणी बाणी’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसमोर आणलेला आहे.



मराठी चित्रपटसृष्टीमध्ये संगीतकार आणि गायक म्हणून कार्यरत असलेले अतुल दिवे, यांनी आता चित्रपट निर्मितीमध्येही पदार्पण केले आहे. ‘स्वरसाक्षी’ प्रॉडक्शन बॅनरखाली ‘पाणी बाणी’ नावाचा चित्रपट यांनी तयार केला असून त्यांनी जलसंवर्धनाचा संदेश देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे.  आता पर्यंत अतुल दिवे यांची १५०० गाणी रेकॉर्ड झाली असून ३५०० गाण्याचे प्रोग्राम त्यांनी आता पर्यंत केलेले आहेत.

या चित्रपटातील गीतांना अतुल दिवे यांनी गीतबद्ध केले असून अतुल दिवे यांनी वैशाली माडे यांच्या सोबत गायनातही आपला सहभाग नोंदविलेला आहे. संगीत संयोजनामध्ये शिव राजोरीया आणि मधु रेडकर यांनी अतुलजींना सहकार्य केले आहे. या चित्रपटाचे संगीत झी म्युझिक कंपनी मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचले आहेच.

या चित्रपटा विषयी अधिक माहिती देताना अतुल दिवे म्हणाले की “ सामाजिक बांधिलकी आणि ज्वलंत समस्येला केंद्रस्थानी ठेवून  पाणी बाणी ची निर्मिती करण्यात आलेली आहे. आज शहरात व खेडोपाड्यात पाणीटंचाई भीषण आहे त्या पाणीस्त्रोताचे संवर्धन आणि नवीन स्त्रोताची निर्मिती करणे काळाची गरज आहे. पाण्याचे थेंब न थेंब साठवले पाहिजे तेव्हाच सगळीकडे आनंदी आनंद पसरू शकले. यावरच पाणी बाणी ची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांनी चित्रपटातून आनंद आणि संदेश घ्यावा.” 

चित्रपटा विषयी अधिक माहिती देताना  डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले की “पाणी टंचाई वर लिहिलेली गीते या चित्रपटाचा आत्मा आहे. या गीतांवर दृश्य स्वरुपात पडद्यावर साकारता येईल का, या वर संगीतकार अतुल यांच्याशी चर्चा करताना या चित्रपटाची संकल्पना पुढे आली.”

या चित्रपटाच्या कथानकात गावाने अनेक वर्ष पाऊस पाहिलेला नाही. दुष्काळाला कंटाळून येथील तरुण गाव सोडून चाललेले याच वेळी बाहेर गावाहुन आलेला एक तरुण त्यांना आश्वासन देतो की मी तुमच्या सर्वांच्या मदतीने गावातील दुष्काळाचा नायनाट करू शकतो. मात्र गावातील जमीनदार या तरुणाचा डाव उलथून टाकण्याचा सतत प्रयत्न करत असतो. परंतु गावकऱ्यांच्या साथीने तरुण गावाला दुष्काळ मुक्त करतो. यात बाहेर गावाहुन आलेल्या तरुणाची(नायक) भूमिका मकरंद अनासपुरे यांनी साकारली असून यात नायक श्रमदानातून गावात जलयुक्त शिवार निर्मितीसाठी झटत आहे. नायकाचा डाव उलथून टाकणाऱ्या जमीनदाराची  भूमिका रविंद्र मंकणी सकारात आहे. त्याच प्रमाणे प्रत्येकवेळी नायकाच्या पाठीशी उभी राहणारी व चित्रपटात सरपंचाच्या (रविराज) मुलीची भूमिका तेजा देवकर (नायिका) यांनी बजावली आहे. जलसंवर्धनाचा संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन आवश्य पाहावा.

माध्यम  संपर्क:- अॅस्पायर पी आर & स्ट्रॅटेजी प्रा.ली. वर्षा मराठे ९३७०२२०२७०, ६४०१०१२८







Comments

Popular posts from this blog

10,900 licences a year needed for an alcohol manufacturing unit, says Pahle India Foundation report on ease of doing business

GoAir launches the “12” fare promotion celebrating the 12th Anniversary

Jaquar Group celebrates the spirit of design by launching Design Confab